Breaking-newsक्रिडा

महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील मुलींच्या संघाला सुवर्णपदक

  • राष्ट्रीय स्कूल गेम्स टेबल टेनिस स्पर्धा

वडोदरा – महाराष्ट्राच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्टस 64 व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेमध्ये मुलींच्या 17 वर्षाखालील सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. भारताची चौथ्या मानांकित स्वस्तिका घोषच्या नेतृत्वाखाली खेळणा-या मुलींच्या ज्युनिअर संघाने गुजरातविरुद्ध अंतिम सामन्यात चमक दाखवली. महाराष्ट्र संघाने 3-0 असा आसाम विरुद्ध विजय मिळवत चांगली सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्राची गाठ कर्नाटकशी होणार आहे. भारताची 31 वी मानांकित अनारग्या मंजुनाथ हिच्याकडे कर्नाटकचे नेतृत्व होते.

महाराष्ट्राच्या संघाने जोरदार कामगिरी करत कर्नाटक संघावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. स्वस्तिकाने अदिती जोशीवर विजय मिळवला तर, मिहीका रोहीराने अनारग्या मंजुनाथला पराभूत केले. यानंतर समृद्धी कुलकर्णीने दृष्टी मोरेला नमवित महाराष्ट्राला 3-0 असा विजय मिळवून देत अंतिम फेरीतील जागा निश्‍चित केली.

अंतिम सामन्यात गुजरात संघाचे आव्हान महाराष्ट्र संघासमोर होते. पहिल्याच सामन्यात स्वस्तिकाने गुजरातच्या कौशा भैरापुरेला 3-0 असे नमवित संघाला आघाडी मिळवून दिली. पण, मिहीका रोहीराला फिलझाह फातेमा कादरीकडून 1-3 असे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे लढत 1-1 अशी बरोबरीत आली.समृद्धीने यानंतर गुजरातच्या नमना जयस्वालला 3-1 असे पराभूत करत आघाडी घेतली. यानंतर निर्णायक लढतीत स्वस्तिकाने विजय मिळवत संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button