Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सफाई कामगारांना सुरक्षितेची साधणे पुरवा; ‘स्मार्ट वॉच’ खरेदी प्रस्ताव रद्द करा – सचिन चिखले

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सफाई कर्मचा-यांना प्रशासनाकडून सुरक्षिततेची साधणे दिली जात नाहीत. त्यांना मोठी जोखीम पत्करून अडचणींचा सामना करत काम करावे लागते. त्यांना ही साधणे पुरविण्याऐवजी प्रशासनाकडून त्यांच्यासाठी ‘स्मार्ट बॉच’ खरेदी केले जात आहे. ‘स्मार्ट वॉच’ खरेदीचा विषय थेटपणे स्थायी समितीच्या समोर न आणता तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

यासंदर्भात गटनेते चिखले यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आरोग्य विभागातील सफाई कर्मचा-यांसाठी ‘स्मार्ट वॉच’ खरेदी करण्याचा विषय प्रशासनाने तयार केला आहे. वॉच खरेदीच्या 6 कोटी 25 लाख 98 हजार 144 रुपये खर्चाच्या विषयाला स्थायीची मंजुरी घेण्यासाठी हा विषय थेट पध्दतीने मंगळवारी (दि. 18) होणा-या स्थायी समिती सभेपुढे आणला आहे. हा विषय थेट पध्दतीने न आणता त्याची माहिती घेण्यासाठी हा विषय रद्द करण्यात यावा.

आज सफाई कर्मचा-यांना, कचरा कामगार, मुकादम यांना काम करत असताना सुरक्षिततेची साधणे पुरविली जात नाहीत. त्यांना जोखीम पत्करून नैसर्गिक अडचणींचा सामना करत काम करावे लागते. महापौर राहूल जाधव यांच्या आदेशानंतर कर्मचा-यांना सुरक्षिततेच्या साधणांअभावी स्मशानभूमीतील गवत कापून काढावे लागत आहे. या कामगारांना साधणे अधी पुरविण्यात यावीत. त्यानंतर अशे विषय घेण्याचा उद्योग करावा, अशी खरमरीत टिकाही चिखले यांनी निवेदनात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button