स्टार्कला मदत करेन – मिचेल जाॅन्सन
पर्थ – ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सन लयीत नसलेल्या आपल्या माजी सहकाऱ्याला मदत कण्यासाठी पुढे सरसावला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्याने मिचेल स्टार्कला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. स्टार्कने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात दोन बळी मिळवले होते तर दुसऱ्या डावात तळाचे तीन बळी मिळवण्यात त्याला यश आले होते.
मुलाखतीत पुढे बोलताना जॉन्सन म्हणाला, तो गोलंदाजी करताना द्विधावस्थेत दिसत होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात काय चालले आहे हे त्यालाच माहिती आहे. मी त्याला मेसेज केला सून जर त्याला काही मदत हवी असेल तर मी उपलब्ध असल्याचे कळवले आहे.
मागील काही वर्षातत्याचा खेळ जवळून पाहिल्याने मला त्याचा नैसर्गीक खेळ माहिती आहे. त्याला मदत हवी असेल तर मी त्याला मदत करू शकतो. ही खेळपट्टी पर्थच्या जुन्या खेळपट्टीप्रमाणेच असल्याने या सामन्यात स्टार्कला गोलंदाजीत मदत मिळून तो भेदक मारा करू शकतो.
पुढे बोलताना तो म्हणाला, तो साध्या चेंडूला स्विंग करण्यात थोडा कमी पडत आहे. त्यामुळे त्याच्या मर्यादा स्पर्धा होत आहे. त्याने चेंडूला स्विंग कारण्याकडे लक्ष द्यावे.