ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकनेत्याच्या वाढदिनी लोकसेवेचा मानवतायज्ञ!

नगरसेविका अर्चना सस्ते यांचा माणुसकीचा हात; कहु–कोयाळीत २०० जीवनावश्यक किटचे वाटप

दुर्गम आदिवासी कुटुंबांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष गावात पोहोचून सेवाकार्य

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव, शुभेच्छा आणि जल्लोष नव्हे, तर समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची संधीही असते. याच सामाजिक जाणिवेतून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ‘ई’ प्रभाग (शिवनेरी) अध्यक्षा तथा नगरसेविका अर्चना राजेश सस्ते यांनी लोकसेवेचा आदर्श जपत दुर्गम आदिवासी भागातील कुटुंबांना मदतीचा हात दिला.

भाजपा नेते तथा भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा.. माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत कहु आणि कोयाळी या दुर्गम आदिवासी गावांमध्ये २०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

नगरसेविका अर्चना सस्ते यांनी दुर्गम गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधला. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून या कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा

राजस्थानच्या कोटा-उदयपूर मार्गावर अपघात; धुळ्यातील ९ जणांचा मृत्यू, ८ जण गंभीर

आपल्या लोकनेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा नगरसेविका अर्चना सस्ते यांचा उपक्रम हा माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेच्या भावनेचा प्रत्यय देणारा ठरला.

यावेळी प्रा. राजेश सस्ते, ज्ञानेश्वर सस्ते, राजू टेकाळे, प्रताप सासवडे, सचिन बनसोडे, नवनाथ बनकर, उदय तापकीर यांच्यासह दोन्ही गावांचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक नेते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सेवाकार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नगरसेविका अर्चना सस्ते, राजेश सस्ते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.

आमदार महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू आणि वंचित कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करणे, हीच आमच्यासाठी खरी वाढदिवसाची भेट आहे. कहु आणि कोयाळी या दुर्गम आदिवासी गावांतील कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांच्या गरजांना हातभार लावता आला, याचे मनापासून समाधान आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचावी, माणुसकीचे नाते अधिक दृढ व्हावे आणि लोकसेवेचा हा प्रवास सातत्याने सुरू राहावा, हीच आमची भावना आहे. महेशदादांच्या लोकसेवेच्या विचारातून प्रेरणा घेत, समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प आम्ही कायम जपू.

– अर्चना राजेश सस्ते, नगरसेविका तथा ‘ई’ प्रभाग अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group