दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा! ‘धुरंधर’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर समय रैना आणि टेलर स्विफ्ट यांचाही गौरव

Dadasaheb Phalke Awards 2026 | मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २०२६’ (DPIFF 2026) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. फेस्टिवलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यंदा या पुरस्कारांमध्ये ‘धुरंधर’ या चित्रपटाचा मोठा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला असून, ‘सैयारा’ फेम अनीत पड्डा हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर नाव कोरले आहे.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय मनोरंजन विश्वातील कलाकारांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींनाही गौरविण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन समय रैना याला ‘कॉमेडियन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, हॉलिवूडचे दिग्गज निर्माते जेम्स कॅमेरून आणि जगप्रसिद्ध पॉप गायिका टेलर स्विफ्ट यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर आपल्या मराठमोळ्या रितेश देशमुखने सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे.
हेही वाचा
View this post on Instagram
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२६ विजेत्यांची संपूर्ण यादी
- सर्वोत्कृष्ट सिनेमा: धुरंधर
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणवीर सिंह
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अनीत पड्डा
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आदित्य धर
- सर्वोत्कृष्ट निर्माता: आदित्य धर, ज्योती देशपांडे, लोकेश धर
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स): ऋषभ शेट्टी
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स): यामी गौतम
- सर्वोत्कृष्ट खलनायक: अक्षय खन्ना
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता: रितेश देशमुख
- कॉमेडियन ऑफ द इयर: समय रैना
- साँग ऑफ द इयर: सैयारा
- सिनेइंडस्ट्रीतील योगदानासाठी विशेष पुरस्कार: कमल हासन
- संगीत क्षेत्रातील योगदानासाठी विशेष पुरस्कार: इलैयाराजा




