Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयटेक -तंत्र । उद्योग । व्यापार

जगभरात मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन; Outlook अन् Teams ठप्प झाल्याने लाखो युजर्स हैराण

Microsoft | जगातील आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) सर्व्हरमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील सेवा ठप्प झाल्याचे समोर आले आहे. या बिघाडामुळे Outlook, Microsoft Teams, Copilot यांसह मायक्रोसॉफ्टच्या इतर महत्त्वाच्या सेवा डाऊन झाल्या असून, लाखो युजर्सचे दैनंदिन कामकाज खोळंबले आहे. ‘डाऊनडिटेक्टर’ (Downdetector) या वेबसाइटवर आतापर्यंत १ लाख ३० हजारांहून अधिक युजर्सनी याबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. ‘दी इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सर्व्हरवर आलेला अतिरिक्त लोड आणि तांत्रिक अडचणींमुळे युजर्सना मायक्रोसॉफ्टची उत्पादने वापरताना मोठ्या समस्या येत असून, अनेक वापरकर्त्यांना आपल्या ईमेल खात्यात लॉग-इन करणे, संदेश पाठवणे, ईमेल उघडणे आणि इनबॉक्स लोड करण्यात अडथळे येत आहेत, तर ‘Teams’ बंद पडल्याने ऑनलाइन मीटिंग्ज घेणेही अशक्य झाले आहे; या तांत्रिक बिघाडाचा Outlook, Microsoft Teams, Copilot, Word, Excel, PowerPoint, SharePoint आणि OneDrive या प्रमुख सेवांना सर्वाधिक फटका बसला असून, त्याचा थेट परिणाम जगभरातील सरकारी कार्यालये, आयटी व व्यावसायिक कंपन्या, शाळा आणि आरोग्य सुविधांवरही झाला आहे.

हेही वाचा

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदनिका वाटपाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे आदेश

मायक्रोसॉफ्टचे स्पष्टीकरण काय?

या बिघाडाबाबत मायक्रोसॉफ्टने अधिकृत प्रतिक्रिया देताना तांत्रिक अडचणीमुळे Teams, Outlook आणि Copilot सह इतर सेवा विस्कळीत झाल्याचे मान्य केले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीची तांत्रिक टीम युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे; मात्र दुरुस्तीचे काम अपेक्षित गतीने होत नसल्याची कबुली कंपनीने दिली आहे. सध्या मायक्रोसॉफ्ट परिस्थितीचा आढावा घेत असून, सर्व सेवा पुन्हा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी नेमका किती वेळ लागेल, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित वेळ जाहीर करण्यात आलेली नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group