Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी मिळणार? २५ नोव्हेंबरपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता!

सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वी खात्यात जमा; ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही, दोन महिन्यांचे ३००० रुपये मिळणार का?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा आर्थिक लाभ देते. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात सरकारकडून सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला. आता ऑक्टोबर महिन्याचे १,५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत एक महत्त्वाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले?

लाडक्या बहिणींना १,५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दिवाळी आणि भाऊबीज या सणांच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. त्यानंतर दिवाळीपूर्वी सरकारने पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये जमा केले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे मिळून ३,००० रुपये एकत्रित दिले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारकडून सप्टेंबर महिन्याचाच १,५०० रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला.

आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने हप्ता वितरणाबाबत निर्णय घेतल्यास २५ नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, २५ नोव्हेंबर ही हप्ता जमा होण्याची अधिकृत तारीख नाही. त्यामुळे महिलांनी राज्य सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.

हेही वाचा –  गरजूंच्या घरात आनंदाचा दीप; आमदार अमित गोरखे यांचा माणुसकीचा हात!

लाडक्या बहिणींना ३,००० रुपये मिळणार का?

दरम्यान, दिवाळीपूर्वी सरकारने दोन महिन्यांचे मिळून ३,००० रुपये दिले नसल्याने आता नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार का, याकडे लक्ष लागले आहे. नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरचा हप्ता न मिळाल्यास डिसेंबरमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे मिळून ३,००० रुपये दिले जाणार का, अशी चर्चा सुरू आहे.

मात्र, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे एकत्र वितरित करण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हप्ता नेमका कधी आणि किती मिळणार, हे सरकारच्या आगामी निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group