TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पवारसाहेबांचा पक्ष फोडला, शिवसेनाही फोडली; मग एकत्र येऊन देश कसा सांभाळणार? संजय राऊतांचा सवाल

शरद पवार हे इंडिया आघाडीचे मजबूत स्तंभ असल्याचे राऊतांचे वक्तव्य; पंतप्रधान मोदींच्या फोनसंदर्भातील चर्चेवरून केंद्र सरकारवर निशाणा.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर संवाद साधल्याच्या वृत्तांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ‘हम सब मिलकर देश संभालेंगे’ असे म्हटले जात असेल, तर मग आमचे पक्ष का फोडले? शरद पवार यांचा पक्ष का फोडला आणि शिवसेनाही का फोडली? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

पवारसाहेब इंडिया आघाडीचे मजबूत स्तंभ

शरद पवार हे इंडिया आघाडीचे मजबूत स्तंभ असून ते आजही त्याच भूमिकेत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. पवार यांची विचारधारा ठाम असून शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांशी त्यांची बांधिलकी आहे. त्यामुळे त्यांच्या विचारधारेत बदल होण्याची शक्यता नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांची भेट घेतली असता त्यांची प्रकृती पाहता ते फारशी चर्चा करण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या पक्षाबाबत आणि अंतर्गत घडामोडींबाबत प्रसारित होणाऱ्या बातम्या हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा –  SRA चे विशेष नियोजन प्राधिकरणाचे अधिकार काढण्याची अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रवादीतील घडामोडींवर राऊतांची टिप्पणी

अजित पवार यांचा गट वेगळा झाला असून, त्या गटातील नेत्यांना अपेक्षित मान-सन्मान मिळत नसल्याची टीका राऊत यांनी केली. सत्ताधारी पक्षाला विधेयके मंजूर करण्यासाठी लोकसभेत ३६ हून अधिक खासदारांची गरज असल्याचेही ते म्हणाले.

सुनील तटकरे यांच्याबाबत बोलताना, ते सध्या ज्या राजकीय परिस्थितीत आहेत ती फारशी अनुकूल नसल्याचे राऊत यांनी म्हटले. हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरील प्रकरणांचा संदर्भ देत त्यांनी सत्ताधारी पक्षातील राजकीय घडामोडींवर टीका केली.

पार्थ पवार हे तरुण नेतृत्व म्हणून पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना त्यांच्या पद्धतीने पक्ष चालवण्याचा अधिकार आहे, असेही राऊत म्हणाले. शरद पवार सक्रिय राजकारणात असून जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, उद्योगपती गौतम अदाणी आणि स्वतः आपण उपस्थित असलेल्या भेटीचा उल्लेखही त्यांनी केला. त्या वेळी पवार यांना पुस्तक हवे असल्याचे सांगितले होते. पुस्तक वाचून लवकर कळते, असे ते म्हणाल्याचे राऊत यांनी नमूद केले.

अश्विनी भिडे यांच्या पत्रावरूनही सरकारवर टीका

मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील काही विकासक बेकायदेशीरपणे प्रकल्प मिळवत असल्याचा आरोप करत, संबंधित विकासकांची नावे पत्रात नमूद असल्याचे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या नावावर हे सर्व सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. आयुक्तांना अस्वस्थ होऊन मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे पत्र लिहावे लागणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचे राऊत यांनी म्हटले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group