“२५०% टॅरिफची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवले”; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा

हेही वाचा
आपल्या भाषणात ट्रम्प यांनी या संघर्षादरम्यान दोन्ही बाजूंची मिळून ११ विमाने पाडण्यात आल्याचाही उल्लेख केला. मात्र, ही विमाने नेमकी कोणाची होती किंवा याबाबतचे अधिकृत तपशील काय, याबाबत त्यांनी कोणतीही स्वतंत्र पुष्टी किंवा पुरावा दिला नाही. “मी अशी अनेक युद्धे थांबवली असून, हे करण्याचा मान मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे,” असेही ते म्हणाले.
भारताकडून मध्यस्थीचे दावे नेहमीच फेटाळले
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी आपणच पुढाकार घेतल्याचा दावा ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा केला आहे. मात्र, भारताने नेहमीच कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. भारताच्या भूमिकेनुसार, पाकिस्तानसोबतच्या लष्करी कारवाया आणि तणावाबाबतची चर्चा ही दोन्ही देशांच्या लष्करी यंत्रणांमध्ये (DGMO पातळीवर) थेट झाली होती. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यांमध्ये आणि भारताच्या अधिकृत भूमिकेत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट होते.




