पिंपळे सौदागरमध्ये केअरटेकरकडून २.२२ लाखांची चोरी; आरोपी अटकेत

पिंपरी | पिंपळे सौदागर येथील डॅफोडाईल्स हाऊसिंग सोसायटीतील एका फ्लॅटमधून सुमारे ₹२.२२ लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी केअरटेकरला अटक केली आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ ते १९ जून २०२६ या कालावधीत पिंपळे सौदागर येथील डॅफोडाईल्स हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅटमध्ये ही चोरी झाली.
हेही वाचा
निष्काळजीपणा कराल, तर सुट्टी नाही; आमदार जगताप यांचा महावितरणला ‘डोस’
या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून, घरात केअरटेकर म्हणून काम करणारा पारस यादव (वय ३०, रा. रहाटणी) याने विश्वासाचा गैरफायदा घेत ₹२.२२ लाख किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मालकाच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरल्याचा आरोप आहे.
सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.





