Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

आदिनाथ कोठारे अन् उर्मिला कानेटकरचा घटस्फोट! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Adinath Kothare and Urmila Kanetkar | गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या असून आदिनाथ आणि उर्मिलाने अधिकृतपणे विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आज (१६ जुलै) दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक संयुक्त पोस्ट शेअर करत पती-पत्नी म्हणून आपला प्रवास संपवत असल्याचे स्पष्ट केले आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना या जोडप्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खूप विचार केल्यानंतर… एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने आम्ही पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.”

हेही वाचा

“मला डेडलाईन द्यायला आवडत नाही..”; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा

घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असला तरी, आपली ८ वर्षांची मुलगी ‘जिजा’ हिच्या प्रति असलेली जबाबदारी दोघेही चोख बजावणार आहेत. “तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आयुष्याच्या या कठीण टप्प्यावर आदिनाथ आणि उर्मिलाने चाहत्यांना आणि मीडियाला एक नम्र विनंती केली आहे. “आमच्या या खासगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही,” असे सांगत त्यांनी आजवर मिळालेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून होत्या चर्चा

२० डिसेंबर २०११ रोजी आदिनाथ आणि उर्मिला विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या १५ वर्षांनंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्मिला कोठारे कुटुंबापासून वेगळी राहत असल्याची चर्चा होती, तसेच आदिनाथच्या ‘पाणी’ या चित्रपटाच्या प्रीमियरलाही ती गैरहजर राहिल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्या नात्याबद्दल तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली होती. अखेर या जोडीने स्वतः समोर येत या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button