ना कॅश, ना क्रेडिट कार्ड, पीएम मोदी परदेशात पेमेंट कसे करतात?

How PM Modi make payments abroad?: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विपक्षीय वार्ता, व्यापार आणि द्विपक्षीय संबंध मजबूत व्हावे यासाठी अनेकदा परदेश दौरे करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते न्यूझीलंड या देशात पोहचले आहेत. या परदेश दौऱ्यात ते स्थानिक बाजारात जाऊन खरेदी करताना दिसले. ही खरेदी करताना तिथे भारतीय चलनाचा वापर होत नाही. क्रेडिट कार्डचा वापर करत नाही, मग परदेश दौऱ्यात एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर पंतप्रधान मोदी हे पेमेंट कसे करतात? काय आहे त्याचे उत्तर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ष 2018 मध्ये जेव्हा सिंगापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एक मधुबनी पेटिंग खरेदी केले होते. हे पेटिंग खरेदी करते वेळी त्यांनी RuPay कार्डचा वापर केला होता. तर ऑगस्ट 2019 मध्ये ते भूतानच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी एक भूतानी हस्तशिल्प खरेदी केले होते. या शेजारच्या देशातही RuPay कार्डचा वापर केला होता.
तर फेब्रुवारी 2024 मध्ये अबुधाबी दौऱ्यात त्यांनी पीएम मोदी आणि युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी पेमेंट केले. त्यासाठी UPI ला युएईच्या ‘AANI’ पेमेंट सिस्टमशी तर रुपे कार्डला तिथल्या ‘JAYWAN’ कार्डशी जोडण्यात आले. या दरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांचे कार्ड स्वाईप करून व्यवहाराची सुरुवात केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी दौऱ्यादरम्यान वस्तू अथवा इतर साहित्य खरेदी करतात. तेव्हा ते UPI अथवा रुपे कार्डचा मुद्दाम वापर करतात. त्यातून भारतीय पर्यटक आणि परदेशी नागरिकांना या पेमेंट वापरासाठी प्रोत्साहन देणे असते. भारतीय डिजिटल पेमेंट पद्धत UPI आणि RuPay जागतिक स्तरावरही मान्य आहे. ती पूर्णपणे सुरक्षित आणि स्वीकृत आहे. अनेक भारतीय आता या डिजिटल सेवेचा परदेशातही वापर करत आहेत.
भारतीय UPI आणि RuPay भारतासह फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात (UAE), सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मॉरीशस, कतार, ओमान, दक्षिण कोरिया या देशात चालते. फ्रान्समधील काही भागात अजून RuPay सेवा चालत नाही. ही सेवा जगभरात पोहचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे.





