आलियाला शर्वरी वाघच्या तुलनेत सर्वाधिक मानधन, बॉबी देओलला किती पैसे मिळाले?

Alpha Cast Fees : आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्या बहुप्रतीक्षित ‘अल्फा’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. YRFच्या या स्पाय अॅक्शनपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कलाकारांच्या मानधनाची चर्चा रंगली असून, त्यात आलिया भट्टने सर्वाधिक मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शर्वरीचे मानधन आलियाच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बॉबी देओल आणि अनिल कपूर यांनाही आलियापेक्षा कमी मानधन मिळाल्याची चर्चा आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, ‘अल्फा’मधील दमदार अॅक्शन भूमिकेसाठी आलिया भट्टला तब्बल २५ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. तर दुसऱ्या सुपर-एजंटच्या भूमिकेत दिसणाऱ्या शर्वरीला ३ कोटी रुपये मिळाल्याचे म्हटले जात आहे. या दोघींच्या मानधनातील मोठ्या फरकामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – ‘मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाला गती द्यावी’; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवा महिला कुस्तीपटूंना आलिया भट्टने भेट दिली. अल्फा च्या प्रदर्शनापूर्वी आलिया भट्टने पुण्यातील एका व्यायामशाळेला भेट दिली. आलियाने कुस्तीपटूंची कठोर सराव सत्रे आणि मैत्रीपूर्ण कुस्ती सामने पाहिले. आदित्य चोप्रा निर्मित आणि शिव रावैल दिग्दर्शित ‘अल्फा’मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट येत्या शुक्रवारी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
यशराज फिल्म्सने अल्फाचा एक हाय-ऑक्टेन बिहाईंड-द-सीन्स व्हिडिओ रिलीज केला आहे. या मेकिंग व्हिडिओमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी चित्रपटातील काही अत्यंत आव्हानात्मक अॅक्शन सीक्वेन्स स्वतः करताना दिसत आहेत.





