Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

भुशी धरण ओव्हरफ्लो; लोणावळ्यात वर्षाविहाराला सुरुवात

सलग पावसामुळे धरण तुडुंब भरले; पायऱ्यांवरून पाणी वाहू लागले, पर्यटकांच्या गर्दीची शक्यता

लोणावळा | प्रतिनिधी

लोणावळा शहरासह परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रसिद्ध भुशी धरण (Bhushi Dam) शुक्रवारी (दि. ३ जुलै) सकाळी पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले. धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने पावसाळी पर्यटनाचा हंगाम अधिकृतपणे सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आगामी शनिवार आणि रविवारच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर भुशी धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामानातील सातत्यपूर्ण बदल आणि डोंगराळ भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरणाने अवघ्या काही तासांत पूर्ण जलसाठा गाठला. गुरुवारी (दि. २ जुलै) धरणाची पाणीपातळी अजून तीन ते चार फूट खाली होती. मात्र, रात्रभर झालेल्या जोरदार पावसानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत धरण तुडुंब भरले आणि धरणाच्या भिंतीवरील पायऱ्यांवरून पाणी वेगाने वाहू लागले.

मागील २४ तासांत लोणावळा शहरात तब्बल ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा, खंडाळा तसेच भुशी धरणाच्या उगम क्षेत्रातील डोंगराळ भागात अद्यापही पावसाची संततधार सुरू असल्याने धरण परिसरातील पाण्याचा प्रवाह कायम आहे.

हेही वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पालखी आगमनाची जय्यत तयारी

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahaenews (@mahaenews)

भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती समोर येताच पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि परिसरातील हजारो पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात भुशी धरणाला भेट देतात. धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात रमण्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत असतात. त्यामुळे येत्या दोन दिवसांत वाहनांची व पर्यटकांची लक्षणीय गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. पायऱ्यांवरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यात अतिउत्साहाने उतरणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आणि पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि इतर स्थानिक व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. पावसामुळे लोणावळ्यातील बहुतांश जलस्रोत तुडुंब भरले असून, हिरवागार निसर्ग, धबधबे आणि धुक्याची चादर यामुळे संपूर्ण परिसराचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. यामुळे आगामी आठवडाभर लोणावळा परिसरात पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button