Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीत 10.85 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त; दोघे अटकेत

पिंपरी | दापोडी परिसरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत 10 लाख 85 हजार 600 रुपये किमतीचे 98.56 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू आहे.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 28 जून रोजी पहाटे एमएनजीएल सीएनजी पंपाशेजारी, सुदामाचे पोहे हॉटेलसमोर, जुना पुणे-मुंबई महामार्ग सर्व्हिस रोड, दापोडी येथे सापळा रचून कारवाई केली. आरोपींकडून 98.56 ग्रॅम एमडी, एक दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण 10.85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या प्रकरणी आर्यन रविंद्र यादव (वय 20, न्यू मोदीखाना कॅम्प, पुणे) आणि शोएब शकील शेख उर्फ वस्ताद (वय 25, रविवार पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

चौकशीत आरोपींनी जप्त केलेला एमडी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली असून तो शोएब शेख उर्फ वस्ताद (गणेश पेठ, पुणे) याच्याकडून मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुरवठादाराचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये कलम 8(क), 22(क) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button