Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेंकडेच; अमित शहांपाठोपाठ मंत्री बावनकुळे यांनीही केले अधोरेखित

मुंबई: शिवसेना एकच असून ती एकनाथ शिंदे यांची असल्याचे विधान भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले होते. त्याचा पुनरुच्चार आता भाजप नेत्यांकडून वारंवार होत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना बाळासाहेबांची खरी शिवसेना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत, असे वक्तव्य के

उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. भाजपने नेहमीच हिंदुत्व आणि राष्ट्रीय अस्मिता मजबूत करण्यासाठी काम केले आहे. आमची पार्टी ही विचारांसाठी काम करते. मात्र, उद्धव ठाकरेंकडे आता बोलण्यासाठी काहीही उरलेले नाही, त्यामुळे सभांमधून फक्त मनातली भडास काढण्याचे काम ते करत आहेत.”

हेही वाचा –  30 जूनपूर्वी पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामे; अन्यथा नव्या नियमांचा बसू शकतो फटका

शिवसेनेच्या मालकी हक्कावरूनही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आणि त्यांची खरी शिवसेना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत.” ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच ते सातत्याने महायुतीवर टीका करत असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सभेतून भाजपवर निशाणा साधला आहे. आपण राम मंदिर उभारलं. आता राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आली आहे ती म्हणजे बाबर जनता पार्टी. ही बाबरांची औलाद आहे. त्या बाबराने ते मंदिर पाडलं होतं, ही बाबराची औलाद आता हे राम मंदिर लुटत आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button