ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

स्वर्गीय सौ. नवल इंद्रमण सिंह जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रियदर्शनी स्कूल, मोशी यांच्या वतीने दिनांक १३ जून २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवा आणि मानवतेचा संदेश जपण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमास Poona Serological Institute Blood Centre यांचे सहकार्य लाभले आहे.

हेही वाचा –  ‘‘राजा शिवाजी’ची एकूण बॉक्स ऑफिस कमाई किती झाली? चित्रपटाने किती नफा कमावला?

रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळू शकते. या शिबिराद्वारे नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा तसेच समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
प्रियदर्शनी स्कूल सर्व पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व परिसरातील नागरिकांना या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहे. “आपले रक्तदान, कोणाचातरी जीवनदान” या संदेशासह समाजहितासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button