Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IND VS AFG: पदार्पणवीर मानव सुथारने पहिल्याच षटकात पटकावली विकेट

IND VS AFG: न्यू चंदीगढ कसोटीत दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याच्या निश्चयासह भारतीय फलंदाज मैदानात उतरले. या सामन्याचे अपडेट्स.

पदार्पणवीर डावखुरा फिरकीपटू मानव सुथारने पहिल्याच षटकात विकेट पटकावण्याची किमया केली. मानवच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका खेळण्याचा अब्दुल मलिकचा प्रयत्न मोहम्मद सिराजच्या हातात गेला. चहासाठी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्तानच्या २८/१ धावा झाल्या आहेत.

-भारताच्या ५६४ धावांसमोर खेळताना अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली आहे.

-भारतीय संघाने ५६४/८ धावांवर डाव घोषित केला. राहुल आणि गिल यांनी शतकी खेळी साकारल्या. ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी ८१ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमने ६ विकेट्स पटकावल्या.

-अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सलीमने डावात पाच विकेट्स पटकावण्याची करामत केली. त्याने मानव सुथारला बाद करत पाचवी विकेट मिळवली.

-प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि मानव सुतार यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांच्या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने पाचशेची वेस ओलांडली आहे.

हेही वाचा –  उष्णतेच्या लाटेत वाढतोय गॅस-अॅसिडिटीचा त्रास! ‘सुपरफूड’ आहाराने मिळू शकतो दिलासा…

-शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा ऋषभ पंत ८१ धावांवर बाद झाला. हशमतुल्ला शाहिदीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ओमरझाईच्या हातात गेला.

-मोहम्मद सलीमचा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न ध्रुव जुरेलच्या अंगलट आला. तो त्रिफळाचीत झाला. जुरेलने १९ धावा केल्या.

-मोहम्मद सलीमने कर्णधार शुबमन गिलची शतकी खेळी संपुष्टात आणली. नव्या चेंडूसह चांगली गोलंदाजी करणाऱ्या सलीमच्या चेंडूवर कव्हरच्या क्षेत्रात चौकार लगावण्याचा गिलचा प्रयत्न फसला आणि विकेटकीपरच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. त्याने १२६ धावांची खेळी केली.

-ओमरझाईच्या गोलंदाजीवर कर्णधार शुबमन गिलने चौकार खेचला आणि भारतीय संघाने चारशेचा टप्पा ओलांडला. एकाच डावात मोठी धावसंख्या उभारून पुन्हा फलंदाजी करायला लागू नये असा भारतीय संघाचा विचार दिसतो.

-आधीच्या प्रसंगातून बोध न घेण्याची शिक्षा अफगाणिस्तानला मिळाली. पुढच्याच चेंडूवर ऋषभ पंत बाद असल्याचं रिप्लेत स्पष्ट झालं होतं. मात्र मैदानावरील पंचांनी बाद दिलं नव्हतं.

-शुबमन गिलला दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच जीवदान मिळालं. ओमरझाईच्या गोलंदाजीवर चेंडू टप्पा पडून गिलच्या पॅड्सवर जाऊन आदळला. पंचांनी बाद नसल्याचा कौल दिला. अफगाणिस्तानच्या कर्णधाराने रिव्ह्यू घेतला नाही. रिप्लेत गिल बाद असल्याचं स्पष्ट झालं.

-कसोटीच्या पहिल्या दिवशी केएल राहुलने जीवदानाचा फायदा घेत संयमी शतकी खेळी साकारली. प्रचंड उष्णता, असमान उसळी मिळणारी खेळपट्टी यांचा सामना करत राहुलने शतक पूर्ण केलं. साई सुदर्शनने ८१ धावांची चांगली खेळी केली. शुबमन गिलने कर्णधाराला साजेशी सुरेख शतकी खेळी साकारली. भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर ३६८/३ अशी मजल मारली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button