ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर येथील योगा पार्कच्या कामांना गती!

भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची पाहणी

नागरिकांच्या हितासाठी महापालिका प्रशासनाला तातडीच्या सूचना

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील बहुप्रतीक्षित ‘योगा पार्क’च्या कामांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सहकारी नगरसेविकांसह पार्कची प्रत्यक्ष पाहणी करत प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणीवेळी नगरसेविका अनिताताई काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे उपस्थित होत्या. नागरिकांच्या आरोग्य आणि विरंगुळ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या योगा पार्कचे काम अद्याप काही तांत्रिक व सुशोभीकरणाच्या टप्प्यात अडकले आहे. पाहणीदरम्यान मेन्टेनन्स, लॉन दुरुस्ती, पेंटिंग, विद्युत व्यवस्था तसेच क्रीडा विभागाशी संबंधित उर्वरित कामांचा आढावा घेण्यात आला. सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करून पार्क लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

हेही वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल

शत्रुघ्न काटे यांनी प्रशासनाला निर्देश देताना सांगितले की, “नागरिकांची दीर्घकाळ प्रतीक्षा लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे तातडीने पूर्ण करावीत. गुणवत्तेवर कोणतीही तडजोड न करता पार्क पूर्णपणे सज्ज करूनच ते नागरिकांच्या सेवेत दाखल करावे.” या पाहणीनंतर प्रशासकीय यंत्रणेत हालचाली वाढल्या असून प्रलंबित कामांना गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. लवकरच हे योगा पार्क नागरिकांसाठी खुले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“पिंपळे सौदागरमधील नागरिकांसाठी हे योगा पार्क केवळ एक प्रकल्प नाही, तर त्यांच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गरज आहे. सर्व विभागांनी समन्वय ठेवून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. कोणतीही शिथिलता न ठेवता दर्जेदार आणि सुरक्षित सुविधा निर्माण करून हे पार्क लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आणणे, ही आमची ठाम भूमिका आहे.”

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button