ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

प्रा . डॉ. आबाजी माने यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ प्रदान

शिक्षण विश्व: आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आनंदोत्सव

पिंपरी-चिंचवड | येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आबाजी माने यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (बामू) वतीने शारीरिक शिक्षण या विषयात मानाची विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. दिनांक ११ मे २०२६ रोजी विद्यापीठाच्या वतीने त्यांना अधिकृतपणे या पदवीने सन्मानित करण्यात आले.

​प्रा. डॉ. आबाजी माने यांनी शारीरिक शिक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण विषयावर आपले संशोधन पूर्ण केले आहे. त्यांनी “विशिष्ट भार प्रशिक्षण कार्यक्रमाचा वेटलिफ्टिंग खेळाडूंच्या शारीरिक सुदृढता व कौशल्य कार्यमान घटकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास” या विषयावर आपला शोधप्रबंध (Thesis) सादर केला होता. त्यांच्या या संशोधनाचा फायदा आगामी काळात वेटलिफ्टिंग क्षेत्रातील खेळाडूंची शारीरिक सुदृढता आणि कौशल्य वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

हेही वाचा

पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट दिला ‘मेलोडी’ चॉकलेटचा पुडा

क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव…

प्रा. डॉ. माने यांना पीएच.डी. पदवी जाहीर झाल्याचे समजताच आकुर्डी येथील डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलासह संपूर्ण शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. ​आपल्या या यशाबद्दल बोलताना डॉ. माने यांनी, हे यश त्यांचे मार्गदर्शक, कुटुंबिय आणि डी. वाय. पाटील कॉलेज प्रशासनाच्या खंबीर पाठिंब्यामुळेच शक्य झाल्याची भावना व्यक्त केली. खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यात वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुधारणा करण्यासाठी आपले हे संशोधन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button