ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आर. सी. सी. बांधकामांवर निष्कासन कारवाई

PCMC: ह-क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमण हटाओ मोहीम

पिंपरी- चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात निष्कासन कारवाई करण्यात आली. यामध्ये नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर आणि गजानन नगर परिसरातील अंदाजे १३० चौरस मीटर क्षेत्रफळावरील ३ अनधिकृत आर.सी.सी. बांधकामांचे निष्कासन करण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच ह क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई पार पडली. या कारवाईमध्ये उप अभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, महापालिका धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने यांच्यासह १८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते. तसेच १० मजूर, १ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर ब्रेकर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा

रावेत येथील एजे फर्निचर मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सकडून गोळीबार!

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करताना आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम करावे आणि नियमांचे पालन करावे. अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button