Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

ISIS कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकि नायजेरियात ठार; ट्रम्प यांची घोषणा

ISIS Commander Killed Abu-Bilal al-Minuki | दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’ (ISIS) विरोधात अमेरिकेने आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत जागतिक पातळीवर या संघटनेचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च कमांडर असलेला अबू-बिलाल अल-मिनुकी (Abu-Bilal al-Minuki) याला कंठस्नान घातले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे या अत्यंत महत्त्वाच्या आणि यशस्वी कारवाईची अधिकृत घोषणा केली. नायजेरियामध्ये अमेरिका आणि नायजेरियन सैन्याने संयुक्तपणे राबवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि थरारक मोहिमेत हा खतरनाक दहशतवादी मारला गेला.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ऑपरेशन केवळ अमेरिकन सैन्याने नव्हे, तर नायजेरियाच्या लष्करासोबत मिळून अत्यंत अचूकपणे फत्ते केले आहे. गेल्या काही काळापासून अल-मिनुकी हा आफ्रिकन देशांमध्ये लपून आपले दहशतवादी नेटवर्क चालवत होता. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे दोन्ही देशांच्या सैन्याने त्याच्या लपण्याच्या ठिकाणावर थेट हल्ला चढवला आणि त्याला युद्धभूमीवरच यमसदनास पाठवले.

हेही वाचा

यंदा केरळमध्ये २६ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या आदेशानुसार अमेरिकेचे शूर सैनिक आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलाने अत्यंत गुंतागुंतीची आणि सुनियोजित मोहीम यशस्वीपणे पार पाडली. जगातील सर्वात सक्रिय दहशतवाद्याचा युद्धभूमीवर खात्मा करण्यात आला आहे. ISIS चा जागतिक कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकी याला आफ्रिकेत लपून सुरक्षित राहता येईल असे वाटले होते, पण त्याचा हा भ्रम होता. त्याच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तचरांची बारीक नजर होती.

जागतिक पातळीवर ISIS चे कंबरडे मोडले

अल-मिनुकीच्या मृत्यूमुळे ISIS च्या जागतिक नेटवर्कला आणि विशेषतः आफ्रिकेतील त्यांच्या वाढत्या प्रभावाला मोठा तडा गेला आहे. आफ्रिकन देशांमध्ये दहशत पसरवणे आणि अमेरिकेसह पाश्चात्य देशांवर मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कट रचण्यात त्याचा मुख्य हात होता.

तो आता आफ्रिकेतील निष्पाप जनतेवर अत्याचार करू शकणार नाही, किंवा अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या कोणत्याही कटाचा सूत्रधार बनू शकणार नाही, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. त्याच्या खात्म्यामुळे ISIS चे जागतिक नेटवर्क आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या मोहिमेत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल ट्रम्प यांनी नायजेरिया सरकारचे विशेष आभार मानले असून ‘गॉड ब्लेस अमेरिका’ म्हणत आपल्या सैन्याचे कौतुक केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button