Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ब्रेकिंग न्यूज : कुदळवाडीत पुन्हा बुलडोझर!

अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेचा 'सर्जिकल स्ट्राईक'

– मोठ्या पोलीस बंदोबस्तात बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात मोठी संयुक्त अतिक्रमण कारवाई राबवत अनधिकृत धार्मिक प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती.

स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, चिखली-कुदळवाडी परिसरात २१ हून अधिक अनधिकृत धार्मिक प्रार्थनास्थळे होती. त्यापैकी किती स्थळांवर कारवाई झाली? याचा अधिकृत आकडा मिळालेला नाही. मात्र, राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर एकाच रात्रीत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

हेही वाचा –  थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा

फेब्रुवारी २०२५ मध्ये कुदळवाडी परिसरातील अनधिकृत भंगार दुकाने आणि अतिक्रमण हटविण्यासाठी मोठी मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे १ हजार एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा प्रशासनाने कारवाईचा हातोडा उगारत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे.

या कारवाईदरम्यान मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानाबाहेरही विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून सतत गस्त आणि नाकाबंदी करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button