Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुण्यात तीन महिन्यांत पॉक्सोचे ५० गुन्हे; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pune POCSO Cases | विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे समोर आले आहे. पुणे शहर परिसरात जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) ५० गुन्हे दाखल झाले आहेत. तर याच काळात विनयभंगाचे तब्बल १४० हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ओळखीचेच ठरताहेत ‘भक्षक’

पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार, बलात्कार आणि विनयभंगाच्या बहुतांश घटनांमधील आरोपी हे पीडित महिला किंवा बालकांच्या परिचयातील आहेत. ओळखीच्या व्यक्तींकडूनच विश्वासाचा गैरफायदा घेऊन अत्याचार केले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. नुकत्याच नसरापूर आणि पर्वती पायथा परिसरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

२०२४ मध्ये बोपदेव घाटात झालेला बलात्कार आणि गेल्या वर्षी स्वारगेट एसटी स्थानक परिसरात घडलेल्या घटनेने पुणे पोलीस दलावर टीका झाली होती. दरम्यान, कोंढव्यातील एका प्रकरणात तरुणीने खोटी फिर्याद दिल्याचेही पोलिसांनी तपासात सिद्ध केले होते. मात्र, सध्या दाखल झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणांपैकी १२ ते १४ प्रकरणे ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आता अधिक कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारी धक्कादायक आहे.

बलात्कार प्रकरण
२०२५ – २४० दाखल गुन्हे
२०२६ – ४९ दाखल गुन्हे
(२०२६ ची आकडेवारी जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतची )

हेही वाचा

पंजाबची बादशाही संपली! हैदराबाद अव्वल स्थानी, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

विनयभंग प्रकरण
२०२५ – ६१३ दाखल गुन्हे
२०२६ – १४० दाखल गुन्हे
(२०२६ ची आकडेवारी जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतची )

बाल लैंगिक अत्याचार प्रकरण
२०२५ – २९९ दाखल गुन्हे
२०२६ – ५० दाखल गुन्हे
(२०२६ ची आकडेवारी जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतची )

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button