Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पर्वतीत आजोबांकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यातील पर्वती भागात 70 वर्षीय आजोबाने 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर.

पुणे : शहरातील पर्वती पायथ्याजवळ एक संतापजनक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. 70 वर्षीय आजोबाने स्वतःच्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच पुण्यातील या प्रकाराने पुन्हा एकदा महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

“तात्या मला ओढून घ्यायचे” – मुलीची धक्कादायक माहिती

पीडित मुलीच्या आई-वडिलांनी सांगितले की, “आम्ही दोघेही कामासाठी बाहेर असतो. रात्री घरी आल्यानंतर मुलीने आम्हाला हा प्रकार सांगितला. तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि नखांचे ओरखडे होते.”

मुलीने यापूर्वीही अशाच प्रकाराची माहिती देत सांगितले की,
“तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे. तेव्हा मी बाहेर पळून गेले होते.”

हेही वाचा : पाणी प्रश्नावर नगरसेवक आक्रमक, पण बिल्डरांच्या हमीपत्रावर मौन!

या वक्तव्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

आईची संतप्त प्रतिक्रिया; कठोर शिक्षेची मागणी

या घटनेनंतर मुलीच्या आईने तीव्र संताप व्यक्त करत म्हटले,
“माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या.”

कुटुंबीयांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, कुटुंबाला सहकार्य केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी परिस्थिती संवेदनशील असल्याने शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button