ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची बारावीच्या निकालात गरुडझेप!

शिक्षण विश्व: विविध विषयांत अनेक विद्यार्थ्यांनी पटकावले १०० पैकी १०० गुण

पिंपरी-चिंचवड: चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित नामांकित ‘प्रतिभा ज्युनिअर कॉलेज’ने यंदाच्या बारावीच्या परीक्षेत आपल्या देदीप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला अशा तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांनी कठीण मानल्या जाणाऱ्या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विज्ञान शाखा: कु. मिहीका आठल्ये (९५%) प्रथम, कु. आर्या कुलकर्णी (९३%) द्वितीय, तर कुमार कुशल तशीलदार (९२.३३%) याने तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखा: कुमार हशीर अत्तार (९४.८४%) प्रथम, कु. श्रावणी राजे शिर्के (९३.८३%) द्वितीय आणि कुमार हेमंत चौधरी (९३.६७%) याने तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखा: कु. आस्था शहा (९०.६७%) प्रथम, कु. मेधा भट (८९%) द्वितीय आणि कुमार जय पणमंद (८५%) तृतीय आला.

हेही वाचा –  ‘पीएमआरडीए’ने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विषयनिहाय ‘शंभर नंबरी’ कामगिरी:

विद्यार्थ्यांनी गणितापासून ते जर्मन भाषेसारख्या विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यामध्ये सुचिर देशमुख (गणित), मिहीका आठल्ये (गणित व जर्मन), हेमंत चौधरी (अकाऊंट, आयटी व गणित), तसेच हसीर आत्तार, चैतन्य दातीर आणि सुहानी पांचाळ (अकाऊंट) यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोहोर उमटवली. या यशाबद्दल कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आणि प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाची आणि कॉलेजमधील सकारात्मक वातावरणाची जोड मिळाल्यामुळेच हे उत्तुंग यश शक्य झाले आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले, त्यांनी कॉलेजचा गौरव वाढवला आहे. भविष्यातही यशाची ही परंपरा अशीच वृद्धिंगत राहील, असा आम्हाला विश्वास आहे.”

— डॉ. वनिता कुऱ्हाडे, प्राचार्य, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button