Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नसरापूर अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सक्रिय

मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या शुभांगी तांबट यांनी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिचे पालक व नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी आयोगाच्या वतीने कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या.

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग सक्रिय झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आयोगाने पोलीस प्रशासनाकडून तपशील मागवून चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, पुणे-बेंगलोर महामार्गावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या वेळीही आयोगाची उपस्थिती होती.

हेही वाचा –  ‘धामणगाव येथील प्रत्येक बाधित कुटुंबाला शासनाची त्वरित मदत’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच न्याय मिळेपर्यंत आयोग पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button