ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पुढाकार; स्वगणनेतून जनगणना मोहिमेला केली सुरुवात

पिंपरी | राष्ट्रीय जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून महाराष्ट्रात औपचारिक सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः स्वगणना करून या उपक्रमाचा शुभारंभ केला. तसेच या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालय येथे १ मे महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी जनगणनेशी संबंधित https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्व ३४ प्रश्नांची माहिती ऑनलाइन भरत स्वगणना जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांना ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी’ प्राप्त झाला. स्वतः पुढाकार घेत स्वगणना करून त्यांनी नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा 

डॉ. सुशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पोर्ट्रेट प्रदर्शन

महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, जनगणना ही केवळ आकडेवारी नसून ती देशाच्या विकासाचा पाया आहे. प्रत्येक नागरिकाने अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे. स्वगणना ही सोपी, सुरक्षित आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.

१ मे ते १५ मे २०२७ या कालावधीत नागरिकांना घरबसल्या स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध असून, त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणकांमार्फत घरोघरी जाऊन जनगणना प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन अचूक माहिती द्यावी, असे आवाहन देखील आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button