Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

भोरमधील 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचार करून हत्या; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे | भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बालिकेवर अत्याचार करून तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचे तपासात समोर आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी तत्काळ पुणे-सातारा महामार्गावर आंदोलन सुरू करत आरोपीला त्वरित कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आंदोलनानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेमुळे नसरापूर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा 

‘घरोघरी महापौर’ उपक्रमातून नागरिकांचा आवाज महापौरांपर्यंत

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांची बाजू ऐकून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button