Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला समर्पित आणि बाराव्या शतकातील या हेमाडपंती शैलीतील मंदिराचा विकास आराखडा प्रशासनाकडे सादर झालेला आहे. हा आराखडा राज्य शिखर समितीकडे आल्यानंतर त्यात प्रस्तावित केलेली कामे व निधीप्रमाणे शासनाकडून मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बार्शी येथील श्री भगवंत मंदिर येथे श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त आयोजित महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर बार्शी शहरात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, धाराशीव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती तेजस्वीनी कथले आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्त्वाचे’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

प्राचीन काळापासून आलेल्या लोकपरंपरा, अध्यात्म तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा जपणे हे गरजेचे आहे. या सांस्कृतिक ठेव्याला जनतेपर्यंत आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता देण्यात येईल आणि श्री भगवंत मंदिर तीर्थ क्षेत्र विकास आराखडयातून या भागाचा विकास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री भगवंत यांची महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button