बॉक्स ऑफिसवर ‘किंग’ची एन्ट्री कधी होणार? SRKच्या नव्या टीझरमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

Shah Rukh Khan’s King Release Date Announced : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘किंग’ या चित्रपटाची रिलीज डेट अखेर अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटने सोशल मीडियावर एक दमदार टीझर शेअर करत हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली
चित्रपटाच्या घोषणेसोबत शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये “A ROAR loud enough to shake the KINGdom” अशी ओळ लिहण्यात आली असून सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. “#ItsKINGTime” हा हॅशटॅगदेखील मोठ्या प्रमाणात ट्रेंड होताना दिसत आहे.
‘पठाण’ फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कोकणात वादळी पावसाचा तडाखा, तर विदर्भात पारा ४४ अंशांच्या पार
यापूर्वी रिलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये शाहरुख खान एका जबरदस्त अॅक्शन अवतारात दिसला होता. सिल्व्हर केस, स्टंट्स आणि स्टायलिश लूकमुळे चाहत्यांनी या टीझरला डोक्यावर घेतलं होतं. “डर नहीं, दहशत हूँ” हा संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. राणी मुखर्जी, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, अर्शद वारसी आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मारफ्लिक्स पिक्चर्सच्या निर्मितीखाली तयार होत असलेला ‘King’ हा 2026 मधील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. भव्य अॅक्शन, स्टार पॉवर आणि मोठ्या स्केलमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करू शकतो, अशी चर्चा आधीपासूनच सुरू आहे.





