TOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत–दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; सामने लाईव्ह कुठे पाहणार?

SA-W vs IND-W | आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज (१७ एप्रिल) सुरुवात होत आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी वर्ल्डकपपूर्वी महत्त्वाची रंगीत तालीम मानली जात आहे.

भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून संघाचे लक्ष आगामी टी-२० वर्ल्डकप जिंकण्यावर केंद्रित आहे. या मालिकेसाठी काश्वी गौतम आणि युवा खेळाडू अनुष्का शर्मा यांना संघात संधी देण्यात आली आहे. तसेच ऋचा घोषच्या जागी उमा छेत्रीला संघात स्थान देण्यात आले आहे.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघही मजबूत तयारीसह मैदानात उतरणार आहे. गेल्या दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये उपविजेता ठरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे यावेळी जेतेपदावर लक्ष्य असणार आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

हेही वाचा      :                गौतम अदाणी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत; अंबानी दुसऱ्या क्रमांकावर

सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

या मालिकेतील पहिला सामना आज (१७ एप्रिल) डर्बन येथे खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० वाजता सामना सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर थेट प्रक्षेपित केला जाणार असून त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

भारत–दक्षिण आफ्रिका महिला टी-२० मालिकेचे वेळापत्रक:

  • पहिला सामना: १७ एप्रिल, डर्बन — रात्री ९:३० वाजता
  • दुसरा सामना: १९ एप्रिल, डर्बन — संध्याकाळी ५:३० वाजता
  • तिसरा सामना: २२ एप्रिल, जोहान्सबर्ग — रात्री ९:३० वाजता
  • चौथा सामना: २५ एप्रिल, जोहान्सबर्ग — रात्री ९:३० वाजता
  • पाचवा सामना: २७ एप्रिल, बेनोनी — संध्याकाळी ५:३० वाजता
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button