Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावती हादरली! १८० अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; नराधम अटकेत

अमरावती | समाज माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून त्यांची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला परतवाडा पोलिसांनी अटक केली आहे. अयान अहमद तन्वीर अहमद असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १८० हून अधिक मुलींचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा दावा समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे आणि एका तरुणाचे आक्षेपार्ह व्हिडिओ व छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अयान अहमद याने विविध मुलींशी ओळख वाढवून त्यांच्या इच्छेविरुद्ध अश्लील चित्रीकरण केले आणि ते फोटो-व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा    :            स्वराज्याच्या इतिहासाची छोटी वारसदार..! 

प्राथमिक तपासात पीडित मुली या अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अंमलदार निलेश काळे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, बदनामीच्या भीतीपोटी अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा तिचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पीडित मुलींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि त्यांना समुपदेशनासह सर्व कायदेशीर मदत दिली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्टला प्रतिसाद देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button