Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

४८ तासात उत्तर द्या… राजस्थान रॉयल्सला BCCI ची नोटीस, वैभवबाबत काय भूमिका?

IPL Anti-Corruption Protocol Breach Rajasthan Royal : सोशल मीडियावर राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंडर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते सामना सुरू असताना डगआऊटमध्ये बसून मोबाईल पाहत होते. यावेळी त्यांच्या शेजारी फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील होता. त्याने देखील मोबाईलची स्क्रीन पाहिली होती. यावरून मोठा गदारोळ आयपीएल वर्तुळात झाला.

आता बीसीसीआयने या प्रकरणाची दखल घेत राजस्थान रॉयल्सला अँटी करप्शन प्रोटोकॉल मोडल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. ही नोटीस रास्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर यांना पाठवण्यात आली आहे. ही घटना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामन्यावेळी झाली होती. यानंतर भिंडर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आयपीएलचे माजी चेअरमन लिलत मोदी यांनी देखील कारवाईची मागणी केली होती.

द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बिंडर यांना बीसीसीआयच्या अँटी करप्शन आणि सुरक्षा युनिटने (ACSU) नोटीस पाठवली आहे. तपासाचा भाग म्हणून येत्या ४८ तासात भिंडर यांना त्यांनी डगआऊटमध्ये मोबाईल का वापरला त्यांचे उत्तर देण्यास सांगितलं आहे. यात वैभव सूर्यवंशीबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सील चेअरमन अरूण धुमल यांनी सांगितलं की, ‘आम्ही ACSU यांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, भिंडर हे डग आऊटमध्ये त्यांचा मोबाईल वापरण्याचं कारण हे त्यांच्या आरोग्याच्या समस्येमुळं असल्याचं सांगितलं जात आहे. आरआरच्या टीम मॅनेजर यांना गेल्या काही दिवसांपासून आरोग्याची गंभीर समस्या आहे. त्यांना फुफ्फुसाचा आजार असून त्यांना नागपूरमध्ये रूग्णालयात देखील दाखल करावं लागलं होतं.

हेही वाचा –  Blood Sugar control exercise | साखर नियंत्रणात ठेवायची? दररोज करा 30-60 मिनिटे व्यायाम

भिंडर यांना डग आऊटमध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी ही त्यांच्या वैद्यकीय कारणांमुळं दिली गेली आहे. मात्र असं असलं तरी त्यांना डग आऊटमध्ये बसून मोबाईल वापरण्याची मुभा देण्यात आलेली नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘रोमी यांचे आरोग्याच्या समस्येमुळं जवळपास १० किलो वजन कमी झालं आहे. त्यांना अस्थमा देखील आहे. त्यामुळं त्यांना जास्त अंतर चालता किंवा सतत पायऱ्या चढता येत नाहीत. ते संघासोबत असतात आणि विविध भूमिका निभावत असतात.

त्यामुळं त्यांना नियम आणि प्रोटोकॉलची माहिती आहे. मात्र त्यांच्याकडे त्यांच्या वैद्यकीय कारणांमुळं मोबाईल होता. जरी डगआऊटमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी असली तरी इथं समस्या तो वापरण्याची आहे. तरी सुद्धा रोमी यांनी कोणाला कॉल केला नव्हता किंवा कोणाचा कॉल रिसिव्ह देखील केला नव्हता. ते आपला फोन फक्त स्क्रोल करत होते. त्यांच्याकडे स्पष्टीकरण देण्यासाठी वेळ आहे. ते ACSU अधिकाऱ्यांना आपलं स्पष्टीकरण देतील.

‘ विशेष म्हणजे भिंडर हे मोबाईल वापरत असताना तिथं युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील होता. तो देखील त्या मोबाईलची स्क्रीन पाहत होता हे व्हायरल व्हिडिओत दिसलं. त्यानंतर या व्हिडिओची सर्वत्र चर्चा झाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button