Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘शिजूका-नॅाडी’ कोण? अंजली दमानिया यांच्या दाव्याने खळबळ

Ashok Kharat Case : राज्यात अशोक खरात प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने दररोज नवीन माहिती समोर येत आहे. एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरू असून, विविध बाजूंनी तपास केला जात आहे. या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा सीडीआर समोर आणला होता. यामध्ये अशोक खरातसोबत कोण कितीवेळा बोललं, याची माहिती अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. यामध्ये त्यांनी थेट राजकीय नेत्यांचा नावांचा उल्लेख केला होता. आता दमानिया यांनी शिजूका नॅाडी नावावे असंख्य कॅाल्स अशोक खरातला आल्याचा दावा केला आहे.

सीडीआरमधील नंबर मी ट्रूकॉलरवर सर्च केलं. त्यावेळी शिजूका, नॉडीचे नाव समोर आले. अशोक खरातने अनेक नंबर्संना कोडवर्ड दिले होते. त्याचाच हा प्रकार असल्याचे अंजली दमानियांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा –  आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान मोदींची पोस्ट; ‘त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं ऐकून..’

अशोक खरातने केवळ महिलांचे लैंगिक शोषणच नव्हे तर अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. शिर्डी येथील जमीन प्रकरणाशी निगडित चौकशी करण्यासाठी एसआयटीचे पथक खरातच्या घरी गेले होते. मात्र, त्याची पत्नी कल्पना खरातला याची चुनक लागताच ती फरार झाली. गेल्या दहा दिवसांपासून ती फरार असून, तिचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी कल्पना खरातच्या मैत्रीणी आणि नोकरांकडे चौकशी एसआयटीकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांची आहे.

अशोक खरातने लोकांना जाळ्यात अडकवून मोठी माया गोळा केली. अनेक ठिकाणी मोठी गुंतवणूक केली. आता सोलापुरातही त्याने कोट्यावधींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात भोंदू अशोक खरात याने कोट्यावधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही जमीन 11 एकरांपेक्षा अधिक असून, या जमिनीचा व्यवहार तब्बल अडीच कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button