दिवंगत महापौर मधुकर पवळे यांना पालिकेतर्फे अभिवादन
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या सुमन पवळे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
निगडी चौकातही असा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमास नगरसदस्या सुमन पवळे, नगरसेवक उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काळभोर, नलिनी फुगे, नारायण फुगे, बापू घोलप, रामा प्रसाद, संतोष कवडे, ज्ञानेश्वर चिखले, राजाराम राऊत, तुकाराम राऊत आदी उपस्थित होते.