पुण्यातील पाषाण तलावातील मासे मृत्यू प्रकरणी महापालिका आयुक्तांची मोठी कारवाई!

पुणे : पाषाण तलावातील मासे आणि इतर जलचरांच्या मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत महापालिका आयुक्तांकडून या प्रकरणांमध्ये पालिकेतील चार अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पाषाण तलावाजवळ असलेला एक एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी ) योग्यरीत्या कार्यरत नव्हता. परिणामी, प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट तलावात सोडले जात होते. त्यामुळे पाषाण तलावातील मासे व इतर जलचरांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ पर्यावरणालाच हानी पोहोचली नाही, तर आसपासच्या परिसरातील सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण झाला होता.
भाषांतलावातील माशांचा यामुळे मृत्यू झाला होता. मासे मृत झाल्याने जागोजागी खच पडला होता. याबाबतच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्यानंतर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाला जबाबदार असलेल्या चार अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, संबंधित मुख्य अभियंत्याकडून या संदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.
या निष्काळजीपणाबद्दल मला दिसणार विभागाचे मुख्य अभियंता यांना खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे स्पष्टीकरण असमाधानकारक आढळल्यास, त्यांच्यावर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार वायसे, कनिष्ठ अभियंता अतुलकुमार कडू, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक विजय भोईर आणि विनायक चोपडे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तातडीने पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर, मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे पालिका प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकल्प १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत बांधण्यात आला होता, परंतु तो पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हता. तपासात असेही दिसून आले. जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिका प्रशासनाने संबंधित मुख्य अभियंत्याकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणात जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या प्राथमिक तपासात तलावा जवळ उभारण्यात आलेले मैलापाणी प्रक्रीया प्रकल्प योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याचे आढळून आले. या केंद्रातून प्रक्रिया न केलेले मैलापाणी थेट पाषाण तलावात सोडण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभागाच्या मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. हा खुलासा समाधानकारक नसेल तर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.





