Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड

मोशीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा जाहीर निषेध;

आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: मोशी परिसरात घडलेली अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. अवघ्या सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर रामू कुंजल निसाद (वय ४०) या नराधमाने केलेला अमानुष लैंगिक अत्याचार हा केवळ एक गुन्हा नसून, माणुसकीला काळिमा फासणारा आणि समाजव्यवस्थेला गंभीर प्रश्न विचारणारा प्रकार आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना समाजात कोणतेही स्थान नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पीडितेला तात्काळ व योग्य न्याय मिळावा, तसेच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी केली आहे.

हेही वाचा: महाराष्ट्राला 37वा जिल्हा मिळणार? राज्य सरकारचा मोठा निर्णय

या संदर्भात आमदार महेश लांडगे, नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी मारुती जगताप, पोलीस उपायुक्त (परिमंडल ३, पिंपरी-चिंचवड) तसेच गणेश जमादार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, MIDC भोसरी पोलीस स्टेशन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली असून, तपासात कोणतीही दिरंगाई न करता आरोपीवर तातडीने आणि कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे. पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला असून, दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

 

“माता भगिनींची सुरक्षा हे आमचे आद्यकर्तव्य आहे.. अशा अमानुष घटनांवर कायमचा आळा घालण्यासाठी कायद्याचा कठोर धाक निर्माण करणे आवश्यक आहे. आमची ही लढाई या 7 वर्षाच्या चिमुरडीला न्याय देण्यासाठी आहे तसेच समाजातील प्रत्येक मुलगी, माता आणि भगिनींच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे. या प्रकरणातील नराधमाला तात्काळ कठोर शिक्षा देऊन पोलीस व न्याय प्रशासनाने कुठल्याही माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिम्मत होणार नाही असा न्याय पीडितेला व तिच्या कुटुंबियांना द्यावा.”

– महेश लांडगे, आमदार भाजपा, पिंपरी चिंचवड

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button