Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

सौरव गांगुलीवर बायोपिक येणार; चित्रपटाच नाव फायनल, राजकुमार राव साकारणार मुख्य भूमिका

Sourav Ganguly Biopic: भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या बायोपिकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं टायटल आता निश्चित झालं असून त्याचं नाव ‘दादा’ असं ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटात गांगुलीची भूमिका साकारणार आहे राजकुमार राव, जो आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.

राजकुमार राव यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये “आणि सुरुवात झाली… फक्त एकच दादा” असं लिहिलं आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून, चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

सौरव गांगुली यांना भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रभावी कर्णधारांपैकी एक मानलं जातं. त्यांनी टीम इंडियाला नवी दिशा दिली आणि अनेक तरुण खेळाडूंना संधी देत मजबूत संघ उभा केला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने आक्रमकता आणि आत्मविश्वास मिळवला.

हेही वाचा –  महाराष्ट्रात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’! पुणे, नाशिकसह १० जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा; उकाडाही वाढणार

राजकुमार राव याने याआधीही अनेक बायोपिक आणि गंभीर भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या आहेत. ‘शाहिद’ चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे गांगुलींच्या भूमिकेत तो किती प्रभावी ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता पुढील काळात चित्रपटातील आणखी पोस्टर्स, टीझर आणि शूटिंगशी संबंधित अपडेट्स समोर येण्याची शक्यता आहे. क्रिकेट आणि सिनेमाचा संगम असलेला हा बायोपिक चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. ‘दादा’ या नावाने येणारा हा चित्रपट सौरव गांगुलीचा प्रवास मोठ्या पडद्यावर कसा मांडला जाणार, याची उत्सुकता सध्या सर्वांनाच आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button