रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ला मागे टाकत ‘हा’ क्राईम थ्रिलर चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये, कुठे पाहायचा? जाणून घ्या…

mardaani 3 : सध्या नेटफ्लिक्सवर अनेक नवीन आणि जुने चित्रपट ट्रेंड होत आहेत, पण एका ॲक्शन थ्रिलर चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर येताच पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. जर तुम्हाला ‘क्राईम थ्रिलर’ चित्रपट पाहण्याची आवड असेल, २ तास ९ मिनिटांचा हा चित्रपट तुमच्या नक्कीच पसंतीस पडेल.
या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना हादरवून सोडणारी आहे. याआधी चित्रपटाचे दोन भाग आले आहेत आणि या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यानंतर आता तिसऱ्या भागावरसुद्धा प्रेक्षकांनी तेवढेच प्रेम केले आहे. हा चित्रपट म्हणजे राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’.चित्रपटगृहांमध्ये यशस्वी ठरल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपटगृहांप्रमाणेच ओटीटीवरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि आता चित्रपटाने नेटफ्लिक्सवरही आपली जादू कायम ठेवली आहे.
२ तास ९ मिनिटांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत असून प्रेक्षकांमध्ये याची जोरदार चर्चा आहे. ‘मर्दानी ३’ चित्रपट नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०’ यादीत पहिल्या स्थानावर आहे.
२७ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आयएमडीबी (IMDb) वर ७.१ रेटिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ चित्रपटांनाही मागे टाकले आहे.





