आयपीएल 2026 ची आजपासून सुरुवात; RCB विरुद्ध SRH सामना किती वाजता सुरू होणार?

RCB vs SRH | आयपीएल २०२६ स्पर्धेचा रणसंग्राम आजपासून सुरू होत असून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन बलाढ्य संघांमधील सामन्याने यंदाच्या हंगामाची रंगतदार सुरुवात होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मागील हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल १८ वर्षांनंतर प्रथमच विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील हा संघ जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, इशान किशनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघ देखील विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हा सामना आज, २८ मार्च रोजी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
हेही वाचा : उत्पादन शुल्कात 10 रुपयांची मोठी कपात; राज्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर जाहीर
हा सामना क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भाषांमध्ये थेट पाहू शकतात. तसेच जियो हॉटस्टार अॅप आणि वेबसाईटवरही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपुर्ण संघ:
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हॅजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान.
सनरायझर्स हैदराबादचा संपुर्ण संघ:
पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), अनिकेत वर्मा, आर स्मरण, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, झीशान अन्सारी, शिवांग कुमार, सलील अरोरा, शाकिब हुसैन, ओमकार तरमळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेरा, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स.





