ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना! गर्भपाताच्या गोळ्यांनंतर तरुणी व नवजात बाळाचा मृत्यू

पिंपरी | पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन एका 22 वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या सात महिन्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चिंचवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सात महिन्यांची गरोदर होती. मात्र याबद्दल तिच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती नव्हती. मंगळवारी सकाळी तिने गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर तिची मुदतपूर्व प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तिला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिची प्रकृती गंभीर झाली.

हेही वाचा     :        उत्पादन शुल्कात 10 रुपयांची मोठी कपात; राज्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर जाहीर

त्यानंतर तिला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. दुसरीकडे, नवजात बाळाला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काही तासांतच दोघांचाही मृत्यू झाला.

या प्रकरणात अनेक संशयास्पद बाबी समोर येत आहेत. तरुणीचा मोबाईल फोन फॉरमॅट केलेल्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे. या तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या कोणी पुरवल्या, तिच्या मोबाईलमधील डेटा कोणी आणि का नष्ट केला, तसेच यामागे कोणाचे दडपण होते का, या सर्व बाबींचा तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button