Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीय पंथीयासोबत अश्लील चित्रफित व्हायरल; राजीनाम्याची मागणी

मुंबई | राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित एक कथित अश्लील चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा दावा केला जात असून विरोधकांकडून झिरवाळ यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत चित्रफितीमध्ये दिसतो आहे. यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांची प्रसारित झालेली चित्रफीत सात महिन्यापूर्वीची आहे. शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर असून शेजारी खाद्य आणि मद्य आहे.

हेही वाचा      :                भामा आसखेड धरण पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम तात्काळ पुर्ण करा; महापौर रवि लांडगे 

दोन महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तेव्हाच झिरवाळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती.

या चित्रफीत प्रकरणाची झिरवाळ यांना कल्पना होती. मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. मंत्री पदासाठी काही इच्छुक असून त्यामधून झिरवाळ यांना लक्ष केले जात असल्याची पक्षांमध्ये चर्चा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button