Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘द ताज स्टोरी’ ते ‘एस्पिरंट्स ३’ या आठवड्यात ओटीटीवर पाहता येणार ‘हे’ सीरिज व चित्रपट; वाचा यादी…

Ott Releases This Week : ओटीटी हे अनेकांसाठी मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम झालं आहे. त्यामुळे दर आठवड्याला ओटीटीवर विविध कलाकारांच्या विविध विषय असलेल्या नवनवीन कलाकृती प्रदर्शित होत असतात. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट व सीरिज प्रदर्शित होत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ९ ते १५ मार्च या कालावधीमध्ये ओटीटीवर काय काय पाहता येणार आहे…

ताज स्टोरी – तुषार अमरीश गोयल दिग्दर्शित व लिखित आणि परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १३ मार्चला ओटीटी प्ले प्रीमियमवर रिलीज होणार आहे.

एस्पिरंट्स ३ – ही लोकप्रिय सीरिजसुद्धा १३ मार्चला ओटीटीवर दाखल होणार आहे. पूर्वीच्या दोन्ही सीझनला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही सीरिज पाहता येणार आहे.

अंधा प्यार 2.0 – हा एक आगळावेगळा रिअॅलिटी शो आहे. ब्लाईंड डेटिंगवर आधारित आहे. कॉमेडियन विवेक समतानी आणि कौस्तुभ अग्रवाल या शोचं सूत्रसंचालन करणार आहेत. १४ मार्च रोजी झी ५वर हा शो प्रसारित होणार आहे.

हेही वाचा –  ‘सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांना तंत्रज्ञानाचे ‘कवच’; एआय आणि ड्रोनद्वारे होणार बागांचे व्यवस्थापन करणार’; पालकमंत्री नितेश राणे

भरथा महासयुलाकु विग्नयाप्ति – हा एक तेलुगू विनोदी चित्रपट आहे. किशोर तिरुमाला लिखित आणि रवी तेजा दिग्दर्शित या चित्रपटात आशिका रंगनाथ महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. झी ५वर १३ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मेड इन कोरिया – रा कार्तिक दिग्दर्शित प्रियांका मोहन मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट १२ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा एक तेलुगू चित्रपट असून, तो एका तरुण महिलेभोवती फिरतो. जिला दक्षिण कोरियाला जायचं असतं. हा चित्रपट दक्षिण कोरियामध्येच चित्रित झाला आहे.

नवाब कैफे – हा एक भावनिक कौटुंबिक तेलुगू चित्रपट आहे. तो हैदराबाद येथील एका जुन्या शहरावर आधारित आहे. १२ मार्च रोजी ईटीव्ही विनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फंकी – हा एक विनोदी तेलुगू चित्रपट आहे. चित्रपटातील अभिनेत्रीला एक विचित्र फिल्ममेकर व्हायचं असतं, जिला पहिली शॉर्ट फिल्म बनवतानाच बऱ्याच अडचणी येतात. पण, नंतर चार कोटींचं चित्रपट बनवताना त्याचं बजेट कधी ४० कोटींचं होतं आणि त्यानंतर येणारा तणाव अशा सर्व गडबडीच्या आणि विनोदी गोष्टी घडायला लागतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट १३ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button