ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘पीसीसीओईआर’ला विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

पिंपरी | पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरु डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर यांनी महाविद्यालयाच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. दीड लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पीसीसीओईआर ची स्थापना २०१४ मध्ये झाली. त्या महाविद्यालयाने यापूर्वीही नॅकचे ‘ए प्लस प्लस’ मानांकन आणि चार विभागांना एनबीएचे मानांकन, एआयसीटी ची मान्यता मिळाले आहे. एआयसीटी ची मान्यता तसेच २०२५ – २६ स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. या महाविद्यालयात ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी, पीएचडी धारक प्राध्यापक ४४ आहेत तर पीएचडी करणारे ५५ प्राध्यापक आहेत. ४१९ पेटंट दाखल केले आहेत. २८५ प्रकाशित झाले आहेत. ५० मंजूर करण्यात आले. ३ पेटंट व्यावसायिकृत करण्यात आले. कॉपीराईट आणि पेटंट मध्ये योगदान दिल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाकडून दोन वेळा पीसीसीओईआर महाविद्यालयाला प्रमाणपत्र मिळाले आहे.

हेही वाचा     :                  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पीसीसीओईआर च्या सर्व प्राध्यापक, कर्मचारी वर्गाचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button