breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पुनावळेत इमारतीवरून पडून पेंटरचा मृत्यू; हिंजवडी पोलिसांत गुन्ह्याची नोंद
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुनावळे येथे इमारतीचे रंगकाम करताना तोल गेल्याने खाली पडून पेंटरचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना आज बुधवारी (दि. 21) दुपारच्या सुमारास घडली.
राधेशाम रामबच्चन वर्मा (वय ३३) असे मृत्यू झालेल्या पेंटरचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार तुषार पाटील, विजय बालवाडकर यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राकेश वर्मा यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराने कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाहीत. त्यामुळे पेंटरचा वरच्या मजल्यावरून तोल गेल्याने तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.