पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचाराचा ‘‘श्रीगणेशा’’
तळवडे-रुपीनगरमध्ये आज शुभारंभ : पंकज भालेकर, शरद भालेकर, सीमा भालेकर आणि चारुलता सोनवणे मैदानात
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक रणधुमाळीत आज रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार थेट मैदानात उतरणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत प्रचाराचा नारळ अजित पवार यांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे.
या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर शरद भालेकर सीमा भालेकर आणि चारुलता सोनवणे हे उमेदवार आहेत. यामधील पंकज भालेकर यांनी मागील नऊ वर्षात रेड झोन बाधित प्रभाग असतानाही विकासाचा प्रवाह तळवडे प्रभागात अजित पवार यांच्या मदतीने आणला. वर्षानुवर्ष प्रस्थापित असणाऱ्या लोकांना युवा विचार काय करू शकतो हे दाखवून दिले.
मागील आठवड्यापासूनच या उमेदवारांनी घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवत प्रचाराला गती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातील विकासकामे, प्रभागातील मूलभूत सुविधा आणि शहरात पक्षावर असलेला जुना भक्कम विश्वास याच्या जोरावर “विश्वास जुना राष्ट्रवादी पुन्हा” हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे प्रभाग क्रमांक १२ सह शेजारील चिखली प्रभाग १, ११ आणि २ मधील राजकीय वातावरण अधिक तापणार, हे निश्चित आहे.
अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने पंकज भालेकर यांच्या पाठपुराव्याने तळवडे, रुपीनगर प्रभागातील विकासकामे..!
१) पिंपरी चिंचवड शहरातील रेडझोन बाधित मिळकतधारकांना मालमत्ता कराच्या सामान्य करात 50% सवलतीच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मा.अजितदादा पवार यांचे तळवडे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार.
२) तळवडे येथील ५९ एकर गायरान जागा पालिकेकडे हस्तांतरण. त्यामुळे सदर जागेत बायोडाव्हरसिटी प्रकल्प साकारत आहे, तसेच या ठिकाणी स्थानिक नागरिक व तरुणांसाठी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी व इतर उपक्रम कार्यान्वित होत आहे.
३) वीज उपकेंद्रासाठी ३२ गुंठे जागा MIDC कडून महावितरणला मिळाली. त्याचे ऑफर लेटर देखील मिळाले.
४) तळवडे येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय सुरु झाले आहे.
५) अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार शहरातील एकत्र कुटुंब व वडिलोपार्जित मिळकतीचे विभाजन मिळकत करासाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर सुरु झाले.






