Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोन्याच्या दराची दीड लाखांकडे आगेकूच… जळगावमध्ये ग्राहकांची चिंता वाढली !

जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेली सोन्याची दरवाढ आठवड्याच्या शेवटी शनिवारी कायम राहिली. त्यामुळे सोन्याच्या दराने पुन्हा एकदा सर्वकालीन उच्चांक केल्याने ग्राहकांची चिंता आणखी वाढली. व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली.

देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने तेजी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने पुन्हा एकदा इतिहास रचत नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला असून, स्पॉट गोल्डची किंमत प्रति औंस ४,५३० डॉलरवर पोहोचली आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी देखील मौल्यवान धातूंमधील तेजी कायम राहिली. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी नवे विक्रमी स्तर गाठले.

फेडरल रिझर्व्हकडून येत्या काळात व्याजदर कपातीची शक्यता आणि कमोडिटी बाजारातील सकारात्मक वातावरण यामुळे सोन्याला मोठा आधार मिळत आहे. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्यायांकडे वाढलेला कल, जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अस्थिरता ही सोने व चांदीच्या किमती वाढण्यामागील प्रमुख कारणे आहेत.

हेही वाचा – मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक बिघडली; छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू

विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडून सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील सोन्याची खरेदी हे सुद्धा सोन्याचे दर सातत्याने वाढण्याचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याची झळाळी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील वर्षातही सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता असल्याने डिसेंबरपर्यंत सोने प्रति औंस सुमारे ४,९०० डॉलरच्या पातळीवर पोहोचू शकते. या वर्षभरात सोन्याच्या किमतींनी एका मागोमाग एक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आगामी वर्षात, म्हणजेच २०२६ मध्ये अमेरिकेकडून व्याजदरात आणखी कपात करण्यात आली, तर सोन्याच्या किमतींना आणखी बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी व्याजदरांच्या वातावरणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढतो, याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होऊ शकतो.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेतही गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख ४१ हजार रूपयांवर स्थिर होते. परंतु, शुक्रवारी दिवसभरात १४४२ रूपयांची दरवाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४२ हजार ४४९ रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला. आठवड्याच्या शेवटी शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा ७२१ रूपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे सोन्याने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४३ हजार १७० रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला. शहरात २१ डिसेंबरला सोन्याचे दर एक लाख ३६ हजार रूपयांपर्यंत होते. त्यानंतरच्या पाच-सहा दिवसांतच सोने सात हजार रूपयांपेक्षा अधिक महागल्याची नोंद घेण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group