ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांचा वाढता पाठिंबा देतोय अनुराधा साळुंके यांच्या विजयाची खात्री!

प्रभाग क्रमांक 3 मधील तापकीर वस्ती, बुर्डेवस्ती आणि चऱ्होली परिसरातील नागरिकांचा अनुराधा साळुंके यांना पाठिंबा

Share On

पिंपरी चिंचवड | चऱ्होली प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असून अपक्ष उमेदवार अनुराधा साळुंके यांना जनसामान्यांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. तापकीर वस्ती, बुर्डेवस्ती आणि चऱ्होली परिसरातील नागरिकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. माजी नगरसेविका सुरेखाताई बाळासाहेब माटे यांनी साळुंके यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.

प्रचारादरम्यान अनुराधा साळुंके यांचा दांडगा जनसंपर्क दिसून येत असून तरुण वर्गामध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा आणि महिलांचा मोठा सहभाग त्यांच्या प्रचारात दिसत आहे. जनतेकडून मिळणारा विश्वास पाहता आपण पूर्ण ताकदीने निवडून येऊ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा     :          श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

अनुराधा साळुंके यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. पाणीपुरवठा आणि रस्त्यांची समस्या सोडवणे महिला सुरक्षेवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा निर्धार आहे.

नागरिकांचा वाढता प्रतिसाद ठरवतोय विजयाची दिशा!

अनुराधा साळुंके यांच्या जमेच्या बाजूंमध्ये विकासाभिमुख दृष्टीकोन, संघटनात्मक, अनुभव, थेट जनतेशी संवाद, स्थानिक प्रश्नांची सखोल माहिती आणि महिलांचे सक्षम नेतृत्व या बाबींचा समावेश होतो. समाजकार्यातील अनुभवामुळे त्या नागरिकांच्या समस्या समजून घेऊन प्रभावी उपाययोजना करू शकतात असा विश्वास मतदारांमध्ये दिसून येत आहे. महिला वर्गाशी झालेल्या संवादात घरगुती आणि आरोग्यविषयक प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले असून या समस्यांवर केवळ आश्वासन न देता ठोस उपाय करण्याचे वचन आपण दिल्याचे अनुराधा साळुंके यांनी सांगितले जनतेकडून मिळणारा वाढता प्रतिसाद हा आपल्या विजयाची दिशा दाखवणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button