ताजणे मळा’ येथे अनुराधा साळुंके यांचा झंझावाती प्रचार
महिलांच्या समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन

पिंपरी चिंचवड : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चऱ्होली बुद्रुक येथील ‘ताजणे मळा’ परिसरात अनुराधा साळुंखे यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे. काल झालेल्या प्रचार दौऱ्यात त्यांनी स्थानिक महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिला वर्गाकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला असून, साळुंके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महिलांच्या प्रश्नांवर दिला भर
प्रचारादरम्यान अनुराधा साळुंके यांनी विशेषतः सर्वसाधारण महिला वर्गाच्या दैनंदिन अडचणी आणि समस्यांकडे लक्ष दिले. महिलांनी पाणी, सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित प्रश्न मांडले. या समस्या केवळ ऐकून न घेता, त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन साळुंके यांनी दिले. “महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक ही माझी प्राथमिकता असेल,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा – शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अभिनेता गोविंदासह ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश
स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका
अनुराधा साळुंके यांनी चऱ्होलीतील स्थानिक प्रश्नांवर आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. त्यांच्याकडे असलेला संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव आणि समाजकार्याची तळमळ यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून भविष्यातील राजकीय संकल्पना त्यांनी जनतेसमोर मांडल्या.
जनतेशी थेट संवाद
साळुंके यांचा प्रचाराचा लहेजा अत्यंत साधा आणि थेट संवाद साधणारा आहे. कोणत्याही औपचारिकतेत न अडकता त्या प्रत्यक्ष घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली जात असून, ताजणे मळा परिसरात त्यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
केवळ आश्वासने न देता जनतेचे प्रश्न सोडवण्यावर मी भर देणार आहे. जनतेशी संवाद साधून विश्वास संपादन करण्यावर माझा भर आहे.
-अनुराधा साळुंके,अध्यक्ष, खुशी चॅरिटेबल ट्रस्ट





